Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 09:03 IST

राखीचा रुग्णालयातील व्हिडिओही केला शेअर, तिला सध्या...

ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही दिवसांपासून रुग्णालयात अॅडमिट आहे. तिच्या गर्भाशयात ट्यूमर आढळून आला. ३ तासांच्या सर्जरीनंतर ट्युमर काढण्यात आला. तिच्यासोबत तिचा पूर्व पती रितेश सिंह आहे जो सोशल मीडियावर राखीचे हेल्थ अपडेट्स देत असतो. त्याने राखीचा नुकताच एक व्हिडिओही शेअर केला होता ज्यात ती नर्सच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करत आहे. आता रितेशने एक धक्कादायक खुलासा केला आहे. राखीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं तो म्हणाला.

रितेशने राखीचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'मी खूप खूश आहे, राखी लवकरच आपल्यात असेल. आज तिला वॉक करताना पाहून बरं वाटलं. देवाचे आभार.'

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रितेश सिंह म्हणाला, "राखीला एका गुप्त ठिकाणी ठेवलं आहे. मी सांगणार नाही ती सध्या कुठे आहे. कारण ती रुग्णालयात असताना तिच्यावर हल्ला झाला होता. तिला जीवे मारण्याचा प्लॅन होता. तिला आता डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र आता ती कुठे आहे हे मी सांगणार नाही. तिचं आज आपलं कोणीच नाहीए. लोक तिला बदनाम करत आहेत. पण तिची स्थिती बघा ते काय ड्रामा वाटतो का? तिच्यावर कधीही कुठेही हल्ला होऊ शकतो. मला तुमच्या पाठिंब्याची गरज  आहे." 

रितेशने नाव न घेता राखीचा दुसरा पती आदिल दुर्रानीवर आरोप लावला आहे. त्याला आणि राखीला धमक्या मिळत असल्याचंही तो म्हणाला. राखी आजारपणाचं नाटक करतेय असं वक्तव्य आदिलने काही दिवसांपूर्वी केलं होतं. दरम्यान राखीची अवस्था पाहून चाहत्यांनी तिच्या तब्येतीत सुधारणा व्हावी अशी आशा व्यक्त केली आहे. 

टॅग्स :राखी सावंतहॉस्पिटलसोशल मीडियाट्रोल