Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'मध्ये जाण्याच्या आधीच RB ने केलेलं भाकीत खरं ठरलं, म्हणाला- "ट्रॉफी ज्याला ती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:29 IST

बिग बॉस मराठी ६ चा ग्रँड फिनालेचा वीक सुरु झालाय. त्याआधीच राकेश बापटने लिहिलेली पोस्ट वाचून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

राकेश बापट आता 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेच्या वीकमध्ये पोहोचला आहे. राकेशचा स्वतःवर इतका विश्वास होता की, 'बिग बॉस मराठी ६'मध्ये जाण्याआधीच त्याने स्वतःबद्दल हे भाकीत केलेलं. राकेशने घरात जाण्याआधीच एक पोस्ट लिहून ठेवली होती. आता राकेश ग्रँड फिनालेत जाताच त्याच्या टीमने ही पोस्ट शेअर केली आहे.

राकेश लिहितो की, ''प्रिय महाराष्ट्र, स्वामींच्या, आईच्या आणि तुमच्या आशीर्वादाने आज मी बिग बॉस मराठी सीझन ६ च्या फिनाले वीकपर्यंत पोहोचलो आहे. शोमध्ये जाण्याआधीच मी हा संदेश माझ्या टीमकडे लिहून ठेवला होता. बिग बॉसचा प्रवास खूप अवघड असतो, जर मी फिनाले वीकपर्यंत पोहोचलो, तर माझी कृतज्ञता तुमच्यापर्यंत पोहोचावी, एवढीच इच्छा होती.''

''आईच्या इच्छेसाठी "नवरी मिळे हिटलरला” या मालिकेत मी "AJ" ची भूमिका साकारली. AJ म्हणजे Mr. Perfect. त्या भूमिकेवर तुम्ही जे भरभरून प्रेम केलंत, त्याला तोड नाही. प्रेक्षक नेहमी विचारायचे, “खऱ्या आयुष्यातही तुम्ही Mr. Perfect आहात का?” तुमच्याच प्रेमामुळे बिग बॉस मराठीचा हा प्रवास माझ्या वाट्याला आला. खरं सांगायचं तर, मी स्वतःला Bigg Boss मटेरियल समजत नव्हतो. हा शो करावा की नाही, याबद्दल मनात दुविधा होती. पण सगळ्यांचा आग्रह बघून मी हे आव्हान स्वीकारलं.''

''AJ सारखा Mr. Perfect फक्त पडद्यावर शोभतो. प्रत्यक्षात आपण सगळेच, मीही, "IMPERFECT" आहोत. याच इंपरफेक्शन्समुळे आयुष्य सुंदर बनतं. माणसं इंपरफेक्ट, नाती इंपरफेक्ट, निसर्गही इंपरफेक्ट. आपण शिकतो, पडतो, धडपडतो, रडतो, हसतो, जिंकतो, हरतो आणि या सगळ्यामुळेच जगण्याला अर्थ मिळतो. आज जर मी बिग बॉस च्या प्रवासात इथवर आलो असेन, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे तुमचं प्रेम.''''ट्रॉफी ज्याला ती खरी मिळायला हवी, त्या सर्वात डिझर्विंग आणि पॉप्युलर कंटेस्टंटला मिळो. महाराष्ट्राचा जो काही निर्णय असेल तो मला “सर आँखों पर, कबूल है."तुमच्या मनात मला जागा मिळाली, माझ्या गुण-दोषांसकट तुम्ही मला आपलं मानलं, त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. “तुम बिन” मी काहीच नाही पुढे सगळं स्वामींच्या इच्छेने. तुमचाच, राकेश बापट (RB)''

English
हिंदी सारांश
Web Title : Raqesh Bapat's Prediction Before Bigg Boss Marathi Came True

Web Summary : Raqesh Bapat, now in Bigg Boss Marathi 6 finale week, had predicted his success before entering the show. He expressed gratitude for reaching the finale due to audience support and acknowledged imperfections, wishing the most deserving contestant wins.
टॅग्स :राकेश बापटबिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनटिव्ही कलाकार