Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंनी वंदना गुप्तेंना गाडीतून उतरवलं होतं खाली; अभिनेत्रीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 18:01 IST

Vandana gupte: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात वंदना गुप्ते यांनी हा किस्सा सांगितला.

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री वंदना गुप्ते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मैत्रीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे वंदना गुप्ते बऱ्याचदा राज ठाकरे यांच्या मैत्रीचे किस्से शेअर करत असतात. बाईपण भारी देवा या सिनेमाचं प्रमोशन करत असताना त्यांनी राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीचा किस्सा सांगितला होता. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्यासोबतचा मैत्रीचा किस्सा शेअर केला. एकदा राज ठाकरे यांनी चक्क वंदना गुप्ते यांना गाडीतून खालती उतरवलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या गाडीचं प्लास्टिकदेखील फाडलं.

अवधूत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात लवकरच वंदना गुप्ते हजेरी लावणार आहेत. या भागाचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वंदना गुप्ते यांनी त्यांच्या नव्या गाडीसोबत घडलेला राज ठाकरेंचा किस्सा सांगितला.

राज ठाकरेंनी गाडी थांबवून तुमच्या गाडीचं प्लास्टिक फाडलं होतं? असा प्रश्न अवधूत गुप्तेनी वंदनागुप्ते यांना विचारला. त्यावर, "मी नवीन गाडी घेऊन त्या गल्लीतून येत होते आणि राजा नेमका तिथे फेऱ्या मारत होता. चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ही. तर नवीन गाडी म्हटल्यावर सीटवर, फ्लॅपवर प्लास्टिक असतं ना मी काय ते काढलं नव्हतं. मी गाडी घेऊन येत होते. मला बघून, 'उतर पहिले त्या गाडीतून', असं म्हणून मला खाली उतरवलं," असं वंदना गुप्ते म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "मी म्हटलं अरे का?, तर म्हणतो, इथे मराठी माणूस दिसतो. कशाला ते प्लास्टिक ठेवायचंय? कशाला वाचवायचंय, कुठे काही डाग पडेल याची भीती वाटते का? असं विचारलं. त्यावर, अरे घरी जाऊन काढते म्हटलं तर त्याने ऐकलं नाही. सरळ गाडीची काच खाली करायला लावली आणि फ्लॅपवरचं प्लास्टिक फराफरा ओढून फाडून टाकलं". 

टॅग्स :वंदना गुप्तेराज ठाकरेसेलिब्रिटीटेलिव्हिजन