Join us

Raj Anadkat: 'टप्पू'सेनेचा कॅप्टन संघाबाहेर! शैलेस लोढानंतर 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ला आणखी एक झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 18:14 IST

Raj Anadkat: शैलेस लोढानंतर राजनं पण ही मालिका सोडल्यानं 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ला आणखी एक झटका लागला आहे.

 गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (taarak mehta ka ooltah chashmah)  ही मालिका चर्चेत येत आहे. जवळपास १४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतून अनेक कलाकारांनी काढता पाय घेतला आहे. तर, काही कलाकारांची नव्याने एन्ट्री होत आहे. यामध्येच तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलश लोढा यांच्यानंतर या मालिकेतील आणखी एका कलाकाराने मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिनेता राज अनादकट 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला अलविदा करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण प्रत्येक वेळी ते या बातम्यांना अफवा म्हणत असत. मात्र, यावेळी टप्पूने स्वतः सोशल मीडियावर शो सोडल्याचं सांगितलं आहे. पोस्ट शेअर करताना राजनं लिहिले, वेळ आली आहे की सर्व चर्चा आणि प्रश्नांना पूर्णविराम लावण्याची. नीला फिल्म्स आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा'सोबतचा माझा करार अधिकृतपणे संपला आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'बद्दल पुढे बोलताना त्याने पुढे लिहिले, मी खूप काही शिकलो आहे. मित्र बनवले ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षे होते. या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. तारक मेहताच्या संपूर्ण टीमचे, माझे मित्रपरिवार आणि तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही सर्वांनी मला टप्पू म्हणून प्रेम दिले. तुमच्या पाठिंब्यामुळे मला चांगली काम करण्याची हिंमत मिळत राहिली. तारक मेहता आणि शोच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट.

राज अनादकटच्या आधी भव्य गांधी तारक मेहतामध्ये टप्पूची भूमिका साकारत होत्या. भव्यने ही मालिका  सोडल्यानंतर राज अनादकट 2017 मध्ये शोमध्ये सामील झाला. टप्पूच्या भूमिकेत राजला लोकांचे खूप प्रेम मिळाले आणि तो सर्वांचा लाडका बनला.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार