Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्यावेळी असं नव्हतं...", गायक राहुल वैद्यने आजकालच्या रिॲलिटी शोची केली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:04 IST

आजकाल रिअ‍ॅलिटी शो म्हणजे नुसता दिखावा आहे असं बोललं जातं. राहुल वैद्यने दिलं थेट उत्तर

राहुल वैद्य (Rahul Vaidya) गायक म्हणून सर्वांना माहित आहेच. मात्र सध्या तो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो विराट कोहलीला आणि त्याच्या चाहत्यांना नावं ठेवत होता. त्यांना जोकर म्हणाला. विराटने मला ब्लॉक केल्याचाही त्याने खुलासा केला. तर आता विराटने अनब्लॉक केलं असून विराट भाईला माझा पाठिंबा आहे अशी त्याने पोस्ट केली. राहुल वैद्य २००४ साली 'इंडियन आयडॉल ' च्या पहिल्याच सीझनमध्ये सहभागी झाला होता. नुकतंच त्याने एका मुलाखतीत त्याने आताचे रिअ‍ॅलिटी शो आधीपेक्षा कसे वेगळे आहेत यावर प्रतिक्रिया दिली.

आजकाल रिअ‍ॅलिटी शो म्हणजे नुसता दिखावा आहे असं बोललं जातं. नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत राहुल वैद्यला याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, "रिॲलिटी शोज आता स्क्रिप्टेड टीव्ही शो बनले आहेत. प्रत्येक रिॲलिटी शोचा एक ठरलेला पॅटर्न आहे. कोणाचा लव्ह अँगल असेल, कोणाची आई घरकाम करणारी असेल किंवा वडील रिक्षा चालवणारे असतील. कोणाच्या घरी राहिलेल्या पिठापासून पोळी बनत असेल आणि हे सगळं जरी नसेल तरी तुम्हाला असं बोलायला सांगितलं जाईल. आधी असं अजिबात व्हायचं नाही. मला जर आधी माहित असतं की हे बोलल्याने मत मिळतात, मी गरीब आहे म्हटल्यावर वोट मिळतील तर आम्हीही असंच बोललो असतो ना...पण आमच्यावेळी तो खूप खरा शो होता. आजसारखं नव्हतं."

परीक्षकांचा धाक असायचा

तो पुढे म्हणाला, "आमच्यावेळी परीक्षकांचा धाक होता. आम्ही त्यांच्याशी आदराने बोलायचो. त्यांच्याशी आमची इथकी जवळीक नसायची. मित्रांसोबत बोलल्यासारखं आम्ही त्यांच्याशी बोलायचो नाही. तितकी शिस्त होती. आता तसं होत नाही."

राहुल वैद्यने बिग बॉस १४ मध्येही दिसला होता. यानंतर तो 'खतरो के खिलाडी ११' मध्ये सहभागी झाला आणि फायनलपर्यंत पोहोचला होता. नंतर तो 'लाफ्टर शेफ्स' मध्ये आला. तर आता याच्या सीझन २ मध्येही तो दिसत आहे. त्यामुळे राहुल वैद्य सध्या एकामागोमाग रिॲलिटी शो करत आहे. 

टॅग्स :राहुल वैद्यसंगीतटेलिव्हिजन