Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 14: लग्नासाठी तयार झाली दिशा परमार, राहुल वैद्यने अली आणि जॅस्मीनसमोर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 18:30 IST

राहुलने बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री घेतली आहे.

राहुल वैद्यने काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस 14' सोडले होते, त्यामुळे चाहत्यांनी त्याला पुन्हा शोमध्ये आणण्याची मागणी केली होती, तर यूजर्सनी पळकुटा म्हणून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण राहुलने बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री घेतली आहे.

राहुलने सांगितले दिशाने काय दिलं उत्तर 'बिग बॉस 14' मध्ये राहुल वैद्यने कन्फेशन रूममधून एंट्री घेतसी आणि त्याला पाहून अली गोनी आनंदाने धावत त्याच्याकडे गेला आणि त्याला मिठी मारली. जॅस्मीननेसुद्धा राहुलला मिठी मारली. राहुलच्या प्रपोजलला दिशा परमारने काय उत्तर दिलं हे जाणून घेण्यासाठी जॅस्मीन उत्सुक होती. जॅस्मीनने राहुलला त्याच्या लग्नाबाबत विचाराले तेव्हा तो म्हणाला, "अजून नाही पण ..."

राहुलला हसला आणि..अलीने राहुल वैद्यला मध्येच थांबवले आणि दिशा परमारने त्याच्या प्रपोजलवर काय उत्तर दिले ते थेट विचारले. यावर राहुलने हसत हसत डोकं हलवलं.

 दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. प्यार का दर्द या टीव्ही शोमध्ये तिने काम केले आहे.  

टॅग्स :बिग बॉस १४जास्मीन भसीन