Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिया लागे ना..! प्रथमेशने केलं गाण्यातून मुग्धाचं वर्णन; तर, मुग्धानेही दिलं त्याला सुरेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 19:03 IST

Mugdha & Prathamesh : जवळपास १५ वर्षांपूर्वी या दोघांची मैत्री झाली आणि त्याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

सध्या मराठी कलाविश्वामध्ये मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate)  या जोडीची चर्चा आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि सगळ्यांना आनंदाचा सुखद धक्का दिला. आमचं ठकलंय असं म्हणून त्यांनी जाहीरपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली. सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. यामध्येच पहिले कोणी कोणाला प्रपोज केलं, त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, घरातल्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती असे कितीतरी प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. 

अलिकडेच प्रथमेश आणि मुग्धाने लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली.  या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यामध्येच या दोघांनीही गाण्यातून एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त केलं.

एखाद्या गाण्यातून एकमेकांना काही सांगायचं असेल तर तुम्ही कोणतं गाणं म्हणाल?, असा प्रश्न प्रथमेश, मुग्धाला विचारण्यात आला. यावेळी 'सुहास्य तुझे मनास मोही, जशी न मोही सुरा सुराही', हे गाण म्हणत प्रथमेशने त्याचं प्रेम व्यक्त केलं. तर, मुग्धानेही तसंच त्याला छान उत्तर दिलं. ना, जिया लागे ना..तेरे बिना मेरा कहीं, जिया लागे ना रे, असं गाणं मुग्धाने सादर केलं.

दरम्यान, प्रथमेश आणि मुग्धा या दोघांनी संगीत क्षेत्रात दोघांचीही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जवळपास १५ वर्षांपूर्वी या दोघांची मैत्री झाली आणि त्याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. या जोडीच्या अफेअरविषयी कळल्यानंतर आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी