Join us

अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 15:55 IST

प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावचा एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करुन तुम्हालाही खळखळून हसायला येईल (namrata sambherao, prasad khandekar)

अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव यांची जोडी कायम चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोच्या माध्यमातून नम्रता-प्रसाद यांची जोडी चांगलीच गाजली. आजही नम्रता-प्रसाद हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवतात. काहीच दिवसांपुर्वी नम्रताने प्रसादचा झोपेचा व्हिडीओ शेअर केलेला. त्यामुळे प्रसादने मी याचा बदला घेईल, असं सांगितलं होतं. आता प्रसादने नम्रताचा खरंच बदला घेतलेला दिसतोय. काय केलंय प्रसादने बघा.

या व्हिडीओत पाहायला मिळतं की, प्रसाद गाडीत बसलाय. त्याने कॅमेरा चालू केलाय. प्रसाद नम्रताच्या सिनेमाबद्दल प्रेक्षकांना सांगतो. नम्रता आणि मुक्ता बर्वेचा 'नाच गं घुमा' सिनेमाबद्दल प्रसाद सांगतो. याशिवाय नम्रताने प्रसादचा काही दिवसांपुर्वी झोपेचा व्हिडीओ शेअर केला. त्याचा बदला प्रसादने घेतलेला दिसतोय. पण नम्रता प्रमोशन करुन थकलीय, असंही तो कौतुकाने म्हणतो. 

पुढे नम्रताची झोप उडवण्यासाठी प्रसाद गाडीच्या म्यूझिक प्लेअरवर 'नाच गं घुमा'चं गाणं लावतो. त्यामुळे नम्रता दचकून जागी होते आणि नाचायला लागते. हा व्हिडीओ बघून तुम्हालाही खळखळून हसायला येईल. दरम्यान नम्रताची भूमिका असलेल्या 'नाच गं घुमा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. नम्रता - मुक्ताच्या या सिनेमाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. हा सिनेमा १ मे २०२४ ला महाराष्ट्रात रिलीज होतोय.

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमहाराष्ट्राची हास्य जत्रामुक्ता बर्वे