Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'मध्ये बोलावलं तर जाशील का? 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरे म्हणाला- "अजून तरी माझा विचार..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:22 IST

हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर मराठीमध्येही दिसणार? प्रणित मोरेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला-"आधीच खूप काही भोगलंय..."

Pranit More: 'बिग बॉस' हिंदीच्या १९ व्या पर्वाची काही दिवसांपूर्वीच सांगता झाली. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्नाने यंदाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. तर फरहाना भट्ट या सीझनची उपविजेती ठरली. दरम्यान, या पर्वात एक मराठमोळा चेहरा देखील पाहायला मिळाला.तो म्हणजे स्टॅंडअप कॉमेडियन प्रणित मोरे. महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे या पर्वाचा विजेता होईल असं अनेकांना वाटलं होतं, मात्र, टॉप ३ मध्येच त्याला समाधान मानावं लागलं. आता बिग बॉस १९ नंतर लवकरच बिग बॉस मराठीचं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

दरम्यान, अलिकडेच 'बिग बॉस' फेम प्रणित मोरेने  'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. यावेळी त्याने वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यावेळी बिग बॉस हिंदीच्या घरातील अनुभव कसा होता. त्या घरामध्ये कसा माहौल होता. असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा प्रणित म्हणाला,"खरंतर हा अनुभव एकदम वेगळा होता. माझ्या घरी सगळे एकदम थट्टा, मस्करी करणारे आहेत, असं वातावरण असतं. माझे मित्र पण तसेच आहेत. त्यामुळे जेव्हा मी या घरात गेलो तेव्हा मला वाटलं सगळे तसेच असतील. मी कधी शो पाहिला नव्हता त्यामुळे मला माहित नव्हतं त्या घरात काय-काय गोष्टी होतात. तिथे गेल्यानंतर पाहिलं की डाळीसाठी भांडण होतंय. गुळासाठी लोक भांडत होते. सुरुवातीचे एक-दोन आठवडे खूप अवघड वाटली. त्यानंतर हळूहळू मला कळायलं लागलं की, काय-काय गोष्टी आहेत. काही गोष्टी मी समजू शकतो, त्यावर बोलू शकतो. नंतर मी शो सुरु केला. तो शो चांगला जाऊ लागला. मग घरच्यांनाही उत्सुकता असायची. नंतर मग मजा यायला लागली."

त्यानंतर या मुलाखतीमध्ये प्रणितला बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून बोलावलं तर जाशील का? असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना तो म्हणाला, "आताच मी एवढे चार महिने बिग बॉसच्या घरात राहिलो आहे.आणि मी आधीच खूप काही भोगलंय. पण, सध्या माझं बिग बॉसमध्ये पुन्हा जाण्याचं मन नाही.  बघूया... अजूनतरी मी असा काही विचार केला नाही.पण, जरा कोणत्या सेलिब्रिटींना मला बिग बॉसमध्ये पाहायचं असेल तर, माझे मित्र आहेत त्यांनाच मला तिथे पाहायला आवडेल." असं मत त्याने मुलाखतीत मांडलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pranit More on potential Bigg Boss Marathi entry: 'No plans yet'

Web Summary : Comedian Pranit More, fresh from Bigg Boss Hindi, says he's not currently considering a Bigg Boss Marathi appearance. He prefers seeing his friends on the show.
टॅग्स :बिग बॉस १९टिव्ही कलाकार