टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेतला आणि वादग्रस्त शो 'बिग बॉस हिंदी'चा १९ वा सीझन काही दिवसांपूर्वीच संपला. गौरव खन्नाने 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकली. या सीझनमध्ये मराठमोळा स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेही चर्चेत होता. गौरव आणि प्रणितची मैत्री प्रेक्षकांना भावली. प्रणितचं मालती चहरसोबत नाव जोडलं गेलं होतं. तसंच प्रणितची आणखी एका सदस्यासोबत चांगली मैत्री झाली होती. मात्र दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं आहे. कोण आहे तो?
बिग बॉस १९ मध्ये प्रणित मोरे आणि अभिषेक बजाज यांच्यातील मैत्री सर्वांनी पाहिली होती. मात्र आता सोशल मीडियावर दोघं एकमेकांना फॉलो करत नाहीत असं चाहत्यांच्या निदर्शनास आलं आहे. अभिषेक बजाज आणि प्रणित मोरे दोघंही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. बिग बॉस संपल्यानंतर झालेल्या पार्टीत अभिषेक आणि प्रणित एकत्र दिसले होते. घराबाहेर आल्यानंतर प्रणितचा पहिला स्टॅण्डअप शो झाला ज्याला गौरव खन्ना, निहाल चुडासमा, बसीर अली यांनी हजेरी लावली होती. प्रणितने त्यांच्यावरही जोक केले होते. या शोला अभिषेक बजाज मात्र आला नाही. आता दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांची मैत्री तुटल्याच्या चर्चा होत आहेत.
नक्की काय झालं होतं?
शोमध्ये एका एपिसोडमध्ये प्रणितला स्पेशल पॉवर मिळाली होती. घरातील एका सदस्याला एलिमिनेशनपासून वाचवण्याची संधी त्याला मिळाली होती. सलमानने त्याला हा निर्णय विचारपूर्वक घ्यायला सांगितला. शोमध्ये कोणी सर्वात जास्त योगदान दिलं आहे त्याला वाचव असं सलमान म्हणाला होता. तेव्हा प्रणितने अभिषेकला न वाचवता अशनूरचं नाव घेतलं होतं. यामुळे अभिषेकचे चाहते प्रणितवर नाराज झाले होते.
Web Summary : Stand-up comedian Pranit More unfollowed Abhishek Bajaj, sparking rumors of a fallout after 'Bigg Boss 19'. Fans noted the social media separation after Pranit chose Ashnoor over Abhishek during an elimination challenge.
Web Summary : 'बिग बॉस 19' के बाद प्रणित मोरे द्वारा अभिषेक बजाज को अनफॉलो करने से दोस्ती टूटने की अफवाहें उड़ीं। प्रशंसकों ने उन्मूलन चुनौती के दौरान प्रणित द्वारा अभिषेक के बजाय अशनूर को चुनने के बाद सोशल मीडिया पर अलगाव देखा।