Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ता माळी मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर करत म्हणाली - मी मराठी, सार्थ अभिमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 17:26 IST

सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर साडीतला फोटो शेअर केला आहे. हिरव्या रंगाच्या साडीत प्राजक्ता खूपच सुंदर दिसते. प्राजक्ताने या सोबत मी मराठी, सार्थ अभिमान असे हॅशटॅग दिले आहेत.  प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत.

नुकतेच प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तसेच तिने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असल्याचेही सांगितले.लकडाउन या चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जुन्नर येथे पार पडले आहे. संतोष रामदास मांजरेकर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

टॅग्स :प्राजक्ता माळी