Join us

प्राजक्ता माळीने साडीतला फोटो शेअर करताच चाहते म्हणाले- तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 07:00 IST

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्राजक्ताने   कलरफुल साडीमधला फोटो शेअर केले आहे. सिंपल लूकमध्ये प्राजक्ता सुंदर दिसते आहे. चाहत्यांनी ही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा अशी कमेंट प्राजक्ताच्या  एका चाहत्यांने फोटोवर केली आहे. 

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने लकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी