Join us

प्राजक्ता माळी बॉलिवूडच्या 'बाजीराव' रणवीर सिंगच्या भेटीनंतर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 20:13 IST

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जुळूनी येती रेशीमगाठ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सातत्याने चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येत असते. प्राजक्ता माळीने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि तिचा त्याच्यासोबतचा अनुभव शेअर केला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर रणवीर सिंगसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, मला नेहमीच त्याचा ऑनस्क्रीन परफॉर्मन्स आवडतो आणि त्यादिवशी सेटवरही आवडला. मला त्याचा ऑफस्क्रीन प्रेझेंसही आवडला. खूप शिकायला मिळाला. खूप मेहनती, ध्येयवादी आणि नम्र. 

तिने पुढे म्हटले की, आणि “रणवीर तूला कसा वाटला performance ?” वगैरे अशा मला onscreen ही गप्पा मारता आल्यात. आज आणि उद्या बघता येतील.

खरेतर प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये आगामी चित्रपट सर्कसचं रणवीर सिंग प्रमोशन करण्यासाठी आला होता. त्यादरम्यानचे प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत. रोहीत शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर यांचीही भूमिका आहे. तर दीपिका पदुकोणचा यात कॅमिओ असणार आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीरणवीर सिंग