Join us

अभिमान! प्राजक्ता गायकवाडने शेअर केली पोस्ट, म्हणाली, "रक्त उसळलंय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 16:16 IST

मराठी सिनेसृष्टीतीलही अनेक कलाकारांनी जालना येथील घटनेचा निषेध सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आज अनेक जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. जालना जिल्ह्यात झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे. मराठी सिनेसृष्टीतीलही अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे. हेमंत ढोमे, अश्विनी महांगडेनंतर आता अभिनेत्री प्राजक्ता गायकडवाडनेही (Prajakta Gaikwad) मराठा आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने येसूबाईची भूमिका साकारली होती. याच मालिकेतील फोटो पोस्ट करत तिने लिहिले, 'रक्त उसळलंय...रक्त पेटलंय...९६ कुळी मराठा..अभिमान...एक मराठा लाख मराठा!' या फोटोसह तिने मराठा आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.

प्राजक्ताची पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलंय. कोणीतरी सेलिब्रिटी आहेत जे आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत आहेत अशा कमेंट केल्या आहेत. 'खरंच आज अभिमान वाटत आहे तुमचा की एक सेलिब्रिटी मराठा आरक्षणावर ऐवढे आत्मियतेने पोस्ट करत आहेत. नाही तर बाकीचे सगळे सेलिब्रिटी मराठा आरक्षणावर एक पोस्ट करत नाही आहेत. अभिमान आहे तुमचा आम्हां सर्वांना. जय शिवराय जय शंभूराजे' अशी कमेंट एकाने केली आहे.

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडमराठी अभिनेतामराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चाजालना