Join us

'शिवपुत्र संभाजी' नाटकातून प्राजक्ता गायकवाड बाहेर?; Bigg boss फेम अभिनेत्री साकारणार येसूबाईंची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 15:57 IST

Shivputra sambhaji :शिवपुत्र संभाजी या नाटकात आतापर्यंत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत होती. मात्र, नुकतीच ती या नाटकातून बाहेर पडली आहे.

जगदंब क्रिएशनचं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सध्या संपूर्ण राज्यभरात गाजत आहे. अनेक शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये या नाटकाचे यशस्वी हाऊसफूल प्रयोग रंगत आहेत. अभिनेता डॉ. अमोल कोल्हे या नाटाकात मध्यवर्ती भूमिका साकारत असून या नाटकासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या नाटकातून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने काढता पाय घेतला आहे.

शिवपुत्र संभाजी या नाटकात आतापर्यंत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत होती. मात्र, नुकतीच ती या नाटकातून बाहेर पडली आहे. तिच्याजागी आता बिग बॉस मराठीफेम एक लोकप्रिय अभिनेत्री या नाटकात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे.

अलिकडेच पुण्यात या महानाट्याचा प्रयोग झाला. या प्रयोगात प्राजक्ताऐवजी अभिनेत्री स्नेहलता वसईकर येसूबाईंच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली. त्यामुळे या नाटकातून प्राजक्ताने काढता पाय घेतल्याचं दिसून आलं. तसंच स्नेहलतानेदेखील तिच्या इन्स्टाग्राम पेजवर या नाटाकाचे काही फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, यापूर्वी स्नेहलताने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत सोयराबाईंची भूमिका साकारली होती. यावेळी ती या महानाट्यात येसूबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. परंतु, प्राजक्ताने हे नाटक का सोडली यामागच कारण अद्याप समोर आलेलं नाही.  

टॅग्स :नाटकप्राजक्ता गायकवाडस्नेहलता वसईकरसेलिब्रिटी