Join us

'या' व्यक्तींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील पूनम पांडे वळली अडल्ट व्हिडीओजकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 12:01 IST

Poonam pandey: अश्लील व्हिडीओ शूट केल्यामुळे अनेकदा पूनम चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे.

बोल्ड कंटेट असलेले व्हिडीओ, फोटोशूट यामुळे कायम चर्चेत येणारी कंटेंट क्रिएटर म्हणजे पूनम पांडे. अश्लील व्हिडीओ शूट केल्यामुळे अनेकदा पूनम चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच पूनमने कंगना रणौतच्या लॉक अप या रिअॅलिटी शो मध्ये सहभाग घेतला आहे. या शोमध्ये तिची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  या कार्यक्रमात ती तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा करत आहे. यामध्येच ती अडल्ट फिल्मकडे कशी वळली हे तिने सांगितलं आहे.

नवी दिल्लीतील सर्वसाधारण कुटुंबात पूनम लहानाची मोठी झाली. वयाच्या १८ व्या वर्षापासून इंडस्ट्रीत नशीब आजमावणाऱ्या पूनमला २०११ मध्ये कॅलेंडर गर्ल म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर तिने मॉडलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. परंतु, सगळं काही ठीक असताना ती अचानकपणे अडल्ट फिल्मकडे कशी काय वळली हा प्रश्न साऱ्यांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर स्वत: पूनमने दिलं आहे.

'तो मला बेडरुमध्ये बंद करायचा आणि...'; अभिनेत्रीने केला पतीविषयी धक्कादायक खुलासा

"ज्यावेळी मी इंडस्ट्रीमध्ये आले त्यावेळी सुरुवातीच्या काळात काही जणांनी मला एक सल्ला दिला होता.  जर हिट व्हायचं असेल तर काही तरी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट कर. मी फक्त लोकांच्या याच गोष्टीवर विश्वास ठेवला आणि हळूहळू त्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली. एकीकडे यश, लोकप्रियता मिळत होती. पण,नंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, कॉन्ट्रोवर्सीमुळे मिळालेली लोकप्रियता केवळ १५ मिनिटांचीच असते", असं पूनम म्हणाली.

दरम्यान, पूनम एक अभिनेत्री होण्याच्या उद्देशाने कलाविश्वात आली होती. मात्र, प्रसिद्ध आणि लोकप्रियता मिळवण्याच्या नादात तिने अडल्ट व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. लॉकअप या कार्यक्रमात पूनम तिच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या नवऱ्यावर सॅम बॉम्बेवर गंभीर आरोप केले होते.

टॅग्स :पूनम पांडेसेलिब्रिटीटेलिव्हिजन