Join us
Daily Top 2Weekly Top 5

७० दिवसानंतर पोहा ते मालपुआ…, अभिजीत सावंतने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 15:40 IST

Abhijeet Sawant : अभिजीत सावंतने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे.

रितेश देशमुखच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडला. बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी शर्यतीत सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांनी टॉप ३ मध्ये आपले स्थान निश्चित केले. पण बिग बॉस १४ ची लोकप्रिय स्पर्धक असलेली निक्की तांबोळी इथेही विजेत्याची ट्रॉफी जिंकू शकली नाही आणि ती दुसरी उपविजेती बनल्यानंतर अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडली. तर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी घेतली. तर अभिजीत सावंत हा प्रथम उपविजेता ठरला. शो संपला असला तरी यातील स्पर्धक सातत्याने चर्चेत येत असतात. दरम्यान, अभिजीत सावंतने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे. 

अभिजीत सावंत बिग बॉसच्या घरात ७० दिवस होता. त्यामुळे आता घराबाहेर पडल्यानंतर त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, त्याच्या बायकोने त्याला विचारलं आज कसं वाटतंय घरचं खाताना. त्यावर अभिजीत म्हणाला, जबरदस्त वाटतंय. खूप दिवसांनी घरचं व्यवस्थित खायला मिळत आहे. नाश्ता पोह्यांऐवजी दुसरं काहीतरी करतो आहे. बिग बॉसच्या घरात पोहे, फोडणीचा भात आणि अंडं या तीन गोष्टी नाश्त्यासाठी फिक्स असायचा. आता मालपोहा खातोय. चहा आणि मालपुआ खाण्याची मजा काही औरच आहे. मालपुआ आणि मी. 

अभिजीतने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ७० दिवसानंतर पोहा ते मालपुआ…हे ट्रान्झिशन खूपच भारी वाटतं आहे! अखेर घरी आणि घरी बनलेले पदार्थ. बायको शिल्पाचा आभारी आहे. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर निक्की तांबोळीने कमेंट केली आहे. तिने लिहिले की, मला पण पाहिजे. त्यावर नेटकऱ्यांनी अभिजीतला तिला देऊ नको असं म्हटलंय.

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठी