Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत! दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा, कोण आहे तो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 09:24 IST

अभिनेत्रीला समुद्रकिनारी गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, फोटो व्हायरल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम पवित्रा पुनिया गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर पवित्राने तिच्या होणाऱ्या पतीची ओळख  गुप्त ठेवली होती. मात्र, आता तिने होणाऱ्या नवऱ्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

पवित्राचा होणारा नवरा मंगेतर जसकोमल सिंग याने स्वतःचे फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जसकोमल सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पवित्रासोबतचे काही अत्यंत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. "सूर्य मावळतोय.. आणि आमचा कायमचा प्रवास सुरू झाला आहे" असे भावनिक कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे. या फोटोंमध्ये हे जोडपे समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहे.

कोण आहे जसकोमल सिंग?जसकोमल सिंग हा अमेरिकेतील एक यशस्वी व्यावसायिक आहे. त्याला संगीताची प्रचंड ओढ असून तो उत्तम पंजाबी गाणी गातो. त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर त्याने गातानाचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. पवित्राने सांगितली होते की, तिचा होणारा नवरा हा अभिनय क्षेत्राशी संबंधित नाही, पण तो एक अत्यंत दयाळू आणि समजूतदार व्यक्ती आहे.

साखरपुड्याबद्दल बोलताना पवित्राने एका मुलाखतीत सांगितले होते की, ते दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. "आम्हाला हे नाते परिपूर्ण वाटते, म्हणूनच आम्ही आयुष्याचा पुढचा टप्पा गाठण्याचा निर्णय घेतला" असे तिने म्हटले. आता या जोडीचे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Pavitra Punia to Wed American Businessman; Romantic Photos Viral

Web Summary : Actress Pavitra Punia, engaged since October 2025, is set to marry American businessman Jaskomal Singh. Singh shared romantic beachside photos, captioned, "Our forever journey begins." The couple's photos have garnered wishes from fans.
टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकारबिग बॉस १९