Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘रात्रीस खेळ चाले २'मध्ये येणार धक्कादायक वळण, शेवंताचा नवरा करणार का आत्महत्या ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:04 IST

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

मालिकेचे कथानक सध्या अण्णा व शेवंता यांच्या भोवती फिरत आहे. शेवंता व अण्णा यांच्या अनैतिक नात्यासंबंधी सर्व माहिती पाटणकर यांना कळली आहे. सुषमा ही अण्णांचीच मुलगी आहे, या धक्कादायक माहितीमुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. या सर्व प्रकाराचा जाब तो अण्णांना विचारतो, परंतु अण्णा त्याला अक्षरश: उडवून लावतात. या सर्व प्रकाराची जबाबदारी ते त्याच्याच माथी मारतात आणि त्याला जीव द्यायला सांगतात. त्यामुळे आगामी भागात पाटणकर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट करणार का? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

टॅग्स :रात्रीस खेळ चालेझी मराठी