Join us
Daily Top 2Weekly Top 5

३६ वर्षांचा संसार मोडत घेतला घटस्फोट, ६६व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 17:00 IST

काही सेलिब्रिटी त्यांच्या सिनेइंडस्ट्रीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

काही सेलिब्रिटी त्यांच्या सिनेइंडस्ट्रीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लाइमलाइटमध्ये आली आहे. या अभिनेत्रीने ६६ व्या वर्षी लग्न करत पुन्हा संसार थाटला आहे. पाकिस्तानातील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे बुशरा अन्सारी. 

७०च्या दशकता बुशरा अन्सारी यांनी छोटा पडदा गाजवला. टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख. जवानी फिर नही आनी, हो मन जहां अशा चित्रपटांतही त्यांनी काम केलं. काही टीव्ही शोसाठी त्यांनी लेखनही केलं. पण, करिअरपेक्षा जास्त अन्सारी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असायच्या. १९७८ साली त्यांनी इकबाल अन्सारी यांच्याबरोबर निकाह करत संसार थाटला. सुखी संसाराच्या ३६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये बुशरा आणि इकबाल घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. तेव्हा त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या. पण, आता त्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहेत. 

पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर १० वर्षांनी अन्सारी पुन्हा विवाहबंधनात अडकल्या आहेत. नुकतंच त्यांनी दुसरं लग्न केल्याचा खुलासा केला आहे. ६७ वर्षीय अन्सारी यांनी गेल्या वर्षभरापासून विवाहित असल्याचं म्हटलं आहे. ६६व्या वर्षी पुन्हा लग्नगाठ बांधल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. अनेकांनी त्यांना यावरुन ट्रोल केलं आहे. तर त्यांच्या चाहत्यांनी अन्सारी यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटिव्ही कलाकार