Join us

"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट

By कोमल खांबे | Updated: April 24, 2025 09:49 IST

प्रसादने गेल्यावर्षी काश्मीरमध्ये व्हॅकेशन प्लॅन करत होत विचार करत होतं म्हटलं आहे. त्याबरोबरच नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन आता काश्मीरला जायची भीती वाटत असल्याची भावना त्याच्या मनात आहे. 

जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर काही पर्यटक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांचं नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचं समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही पोस्ट शेअर करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरनेही याबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

या पोस्टमधून प्रसादने गेल्यावर्षी काश्मीरमध्ये व्हॅकेशन प्लॅन करत होत विचार करत होतं म्हटलं आहे. त्याबरोबरच नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन आता काश्मीरला जायची भीती वाटत असल्याची भावना त्याच्या मनात आहे. 

प्रसाद खांडेकरची पोस्ट

साला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोक लपून येतात आणि दहशतवाद माजवून पुन्हा बिळात लपतात आणि 146 करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला हादरवतात ....भ्याड भ्याड भ्याड अतिशय तीव्र शब्दात निषेध

माणूस म्हणून जगायचं नाहीच का ???

जे मृत्युमुखी पडलेत त्यांचा नेमका दोष काय ???

वर्षभर कष्ट करून नोकरी धंद्यातून वेळ काढून आपल्या बायका पोरांना कुटुंबाला वेळ दिला हा दोष आहे?

की

व्हेकेशन स्वित्झर्लंडला नको आपल्या भारतातच एवढी स्थळ आहेत. काश्मीरचा बहुतांश आर्थिक डोलारा हा पर्यटनावर आहे. आपण त्यांना मदत करूया... भारतातच फिरुयाहा दोष आहे

मी खरंच गेल्या महिन्यात विचार करत होतो. यंदा काश्मीरला जाऊया फिरायला. पण आत्ता मी माझ्या नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन कशी हिम्मत करेन तिथे जाण्याची...

अन्न वस्त्र निवारा नंतर स्वतःच्या जीवाची हमी, सुरक्षा ही बेसिक गरज आहे. त्यांनतर सगळं विकास , आर्थिक महासत्ता ,5g , समुद्रखालून ट्रेन , मोठा ब्रिज , बुलेट ट्रेन ,टनेल फिनेल, मंगळावर चंद्रावर स्वारी , ऑलम्पिक पदक , परराष्ट्र धोरण , मोठी धार्मिक स्थळ , उच्च शिक्षण , ev गाड्या , सगळं सगळं बघूया ....

आधी जीवाची गॅरंटी द्या जे बेसिक आहे ....प्लिज

आणि त्यासाठी दहशतवादाच समूळ उच्चाटन हा एकच पर्याय आहे ....

मृत्युमुखी पडलेल्या 'सामान्य' जनतेला भावपूर्ण श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण आहेत. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक केलं आहे. भारताने अटारी चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना १ मे पर्यंत परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना पुढच्या ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे.  भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीरटिव्ही कलाकार