Join us

या टिव्ही अभिनेत्रीची झाली बिकट अवस्था, दागिने विकून घर चालवण्याची आली तिच्यावर वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 13:31 IST

सहकलाकाराकडून देखील ती पैसे उसणे घेते.

टिव्ही आणि सिनेमा या ग्लॅमर माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. टिव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार सध्या अशाच कठिण परिस्थितून जातेय. 'अगले जनम मोहे बिटिया कीजो'  आणि स्वरागिनी सारख्या मालिकांमध्ये काम केलेली नुपूर ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र सध्या तिच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. दागिने विकून ती घर चालवतेय.    

 नुपूरवर ही वेळ पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने आणलेल्या निर्बंधमुळे झाली आहे. आरबीआयने ग्राहकांना पुढील सहा महिने केवळ 25 हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे. नुपूरचे सगळे अकाऊंट याच बँकेत आहेत त्यामुळे ती आर्थिक अडचणीत सापडली आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नुपूरने सांगितले की, मी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. माझे दुसऱ्या बँकांमध्ये सुद्धा खाते होते ज्यातील रक्कम मी काही वर्षांपूर्वी  पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत ट्रान्सपर केली होती. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची संपूर्ण जमापुंजी याच बँकेत असल्याने आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहे.  

आमच्या  घरात कोणतेच पैसे नाहीत आणि आमचे सगळे अकाऊंट पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे माझ्याकड घर चालवण्यासाठी दागिने विकण्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नाही. ऐवढेच नाही तर मी माझा सहकलाकाराकडून 3000 रुपये उसणे घेतले आहे. आतापर्यंत मी मित्रांकडून 50,000 हजारांचे कर्ज घेतले आहे.    

टॅग्स :टिव्ही कलाकारपीएमसी बँक