Join us

तेजश्री प्रधानच्या नव्या सासूबाईंना भेटलात का?, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 16:05 IST

अभिनेत्री तेजश्री प्रधान झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय.

मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. तेजश्री सोबतच या मालिकेत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेली ही मालिका नक्कीच रंजक असेल यात शंकाच नाही. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि या प्रोमोमुळे प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

या मालिकेचे कलाकार आणि प्रोमोज यांनी तर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंच आहे पण त्याहीपेक्षा वेगळा अजून एक मालिकेचा हटके प्रमोशनल फंडा चर्चेत आहे. लग्नात नवदाम्पत्य उखाणे घेतं तीच प्रथा थोड्या हटके रूपात मालिकेच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर सादर केली आहे.

झी मराठीच्या सोशल मीडियावर उखाण्यांची स्पर्धा आयोजित केली आहे पण हा उखाणा फक्त सासू किंवा सुनेवर असणं अनिवार्य आहे. या कॉन्टेस्टला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपल्या निराळ्या अंदाजात प्रेक्षकांनी देखील अनोखे उखाणे सादर केले आहेत. त्यामुळे सासूबाईंचा प्रमोशनल फंडा एकदम हटके आहे हे म्हटल तर खोटं ठरणार नाही.

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईझी मराठीतेजश्री प्रधान