Join us
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! अभिनेत्रीने ७५ वर्षाच्या वृद्धाकडून उकळले ११ लाख; पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2023 11:14 IST

त्या वृद्ध व्यक्तीला त्याचे घर भाड्याने द्यायचे होते आणि नित्याने त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला.

साऊथ टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्रीने तिची मैत्रिणीला पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणात एका वृद्धाला अडकवून त्याच्याकडून 11 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. केरळच्या पठाणमथिट्टा मध्ये राहणाऱ्या या मल्याळम अभिनेत्रीचं नाव नित्या ससी असं असून तिला आणि आणि तिची मैत्रिण बिनू या दोघांना नुकतंच कोल्लम येथे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना केरळमधील परवूर जिल्ह्यात घडली आहे.

या दोघांनी मिळून केरळ विद्यापीठातील माजी कर्मचारी आणि 75 वर्षीय माजी सैनिक (तिरुवनंतपुरम) यांना आपला बळी बनवले आहे. या घटनेची सुरुवात 24 मे रोजी झाली. असे सांगितले जाते की त्या व्यक्तीला त्याचे घर भाड्याने द्यायचे होते आणि नित्याने त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला.

काही दिवसांनी नित्या घर बघायला आली आणि तिची त्या व्यक्तीशी चांगलीच मैत्री झाली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,  ''काही दिवसांनी त्यांनी त्या व्यक्तीला धमक्या देण्यास सुरुवात केली. एकदा तिने घरी येऊन त्या अधिकाऱ्याला कपडे काढण्यासाठी धमकावले, मोबाइलमध्ये नग्न अवस्थेतील अश्लील फोटोज काढले.त्यावेळी तिथे तिची मैत्रिण बानूदेखील होती. ''

या दोघांनी त्या वृद्ध व्यक्तीकडे 25 लाखांची मागणी केली आणि फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली. धमक्या दिल्यानंतर अखेर त्या व्यक्तीने त्यांना 11 लाख रुपये दिले. आता हे प्रकरण संपेल, असे त्याला वाटले, मात्र त्यानंतर या दोघांनी पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. त्यांच्या या धमक्याना कंटाळून त्या वृद्धाने या दोघांच्या विरोधात परावुर येथील पोलिस चौकीत तक्रार नोंदवली. नित्या आणि बिनू दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

 

 

टॅग्स :टिव्ही कलाकारगुन्हेगारी