Join us

Video : अभिनेता विभू राघव कॅन्सरच्या लास्ट स्टेजवर, आजारपणाबद्दल बोलताना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:12 IST

Video : टीव्ही अभिनेता विभू राघवने रूग्णालयातून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ  तुम्हालाही भावुक करेल.

टीव्ही अभिनेता विभू राघव सध्या रूग्णालयात आहे. विभू कॅन्सरने पीडित असून त्याचा कॅन्सर लास्ट स्टेजवर पोहोचला आहे. विभूने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या आजारपणाबद्दल सांगितलं आहे. त्याच्या आजारपणाबद्दल ऐकून टीव्ही सेलिब्रिटींसोबतच विभूच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

मी रूग्णालयात आहे.  काय सुरू आहे, हे तुम्हाला सांगावं असा विचार केला. मी गेल्या काही दिवसांपासून आजारी होतो. दोन आठवड्यांपूर्वीच मला कॅन्सर असल्याचं निदान झालं. मला स्टेज 4 कॅन्सर आहे आणि तो धोकादायक आहेत. आयुष्यात असं काही घडेल, असा विचार केला नव्हता. पण एका दिवसांतच सगळं काही बदललं. सगळं काही विस्कटलं. माझ्या आजूबाजूला चांगले डॉक्टर्स आहेत. चांगली टीम आहे आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे. सगळे माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. चला, चांगल्याची आशा करूया, असं विभू या व्हिडीओत म्हणताना दिसतो आणि बोलता बोलता त्याला अश्रू अनावर होतात.

विभूच्या आजारपणाबद्दल समजताच त्याचे मित्र व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही सेलिब्रिटींनीही त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे. तू आणखी फिट होऊन परतशील, अशी कमेंट शालियन मल्होत्राने केी आहे. मेरी जान, आम्ही तुला 6 पॅक एब्जसोबत परत पाहू, अशा शब्दांत मोहसीन खानने त्याला धीर दिला आहे.विभू हा ‘निशा और उसके कझिन्स’ या मालिकेत दिसला होता. याशिवाय सुवरीन गुग्गल- टॉपर ऑफ द इयर या मालिकेतही तो झळकला होता.

टॅग्स :टेलिव्हिजन