Join us
Daily Top 2Weekly Top 5

"नवीन सुरुवात करतोय...", 'हसताय ना? हसायलाच पाहिजे'साठी निलेश साबळेची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 16:55 IST

'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर निलेश साबळे त्याचा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' असं आपुलकीने विचारणारा सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे निलेश साबळे. 'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर निलेश साबळे त्याचा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या शोमधून निलेश साबळे पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी आणि त्यांचं पुरेपूर मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोसाठी त्याने खास पोस्ट टाकली आहे. 

निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. या शोच्या सेटवरील व्हिडिओ शेअर करत निलेश साबळेने खास पोस्ट लिहिली आहे. या व्हिडिओत निलेश साबळे रंगमंचाच्या पाया पडताना दिसत आहे. त्यानंतर सेटवरील कलाकारांची तो भेट घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत निलेश साबळे म्हणतो, "नवीन सुरूवात करतोय.. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा असू द्या…! हसताय ना? हसायलाच पाहिजे! कलर्स मराठी वर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता …". 

निलेश साबळेचा हा नवा शो कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. २२ एप्रिलपासून 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' या शोमधून निलेश साबळे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. या शोमध्ये निलेश साबळेसोबत भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम हे कलाकार दिसणार आहे. या शोमध्ये 'बाईपण भारी देवा'ची टीम सहभागी होणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. 

टॅग्स :निलेश साबळेटिव्ही कलाकारसेलिब्रिटी