स्टार प्रवाह वाहिनीवर 'शिट्टी वाजली रे' हा सेलिब्रिटी कुकिंग शो नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी त्यांचे कुकिंग टॅलेंट दाखवताना दिसत आहेत. या शोमध्ये बिग बॉस फेम निक्की तांबोळी आणि सोशल मीडिया रीलस्टार विनायक माळीदेखील सहभागी झाले आहेत. 'शिट्टी वाजली रे'मध्ये निक्की आणि विनायकची जोडी जमली आहे. ते दोघेही या शोमधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत.
'शिट्टी वाजली रे'मधील निक्की तांबोळी आणि विनायकचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत निक्की आगरी भाषेतून विनायकसाठी उखाणा घेताना दिसत आहे. "चांदीच्या वाटीत मटणाचं तुकडं...घास भरवते मेल्या तोंड कर इकडं", असा उखाणा निक्कीने विनायकसाठी घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
'शिट्टी वाजली रे'मध्ये विनायक माळी, निक्की तांबोळी, मधुराणी गोखले, रुपाली भोसले, घनश्याम दरवडे, प्रियदर्शन जाधव, धनंजय पोवार, हेमंत ढोमे, गौतमी पाटील, आशिष पाटील, स्मिता गोंदकर, पुष्कर क्षोत्री हे कलाकार आहेत.