Join us
Daily Top 2Weekly Top 5

"निक्की तांबोळीच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया? अरबाज पटेलसोबत रुग्णालयाबाहेर दिसली; नक्की झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:38 IST

अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

'बिग बॉस मराठी ५'मुळे प्रसिद्धीझोतात आलेली निक्की तांबोळी नुकतीच रुग्णालयाच्या बाहेर दिसली. तिच्या डोळ्याला पट्टी लावलेली दिसली. यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत. तिच्यासोबत बॉयफ्रेंड अरबाज पटेलही दिसत आहे. अरबाज आणि निक्कीने 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन गाजवला होता. आता अरबाजने निक्कीला नक्की झालंय काय याबद्दल अपडेट दिलं आहे.

अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये दोघंही रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहेत. निक्कीने फुल स्लीव्ह्ज टू पीस ड्रेस घातला आहे. तर अरबाज कॅज्युअल लूकमध्ये आहे. निक्कीच्या डाव्या डोळ्याला पट्टी लावलेली दिसत आहे. तिला नक्की झालं काय असाच प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर निक्कीच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "निक्कीला नक्की काय झालंय?", "तिच्या डोळ्याला दुखापत झाली की शस्त्रक्रिया झाली?" असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. काही चाहत्यांनी तिला 'लवकर बरी हो' (Get well soon) अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.

निक्कीच्या तब्येतीबाबत चाहत्यांची चिंता पाहून अखेर तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलने मौन सोडलं आहे. अरबाजने एका मुलाखतीत स्पष्ट केले की निक्कीच्या डोळ्याला एक लहानशी दुखापत झाली होती. यासाठी डॉक्टरांनी तिला छोटी सर्जरी  करण्याचा सल्ला दिला होता. तिची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्यासारखे काहीही नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही दिवस तिला डोळ्याची काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच ही पट्टी लावण्यात आली आहे." 

English
हिंदी सारांश
Web Title : Nikki Tamboli spotted with eye bandage; what happened to her?

Web Summary : Nikki Tamboli, recently seen leaving a hospital with an eye bandage, concerned fans. Boyfriend Arbaaz Patel revealed she had a minor eye injury requiring surgery. Her condition is stable, and she needs post-operative care.
टॅग्स :सेलिब्रिटीहॉस्पिटलमुंबईटेलिव्हिजनसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ