Join us

'माझा होशील ना' सई आदित्य सोडणार मामांची साथ, वेगळा थाटणार का संसार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 13:01 IST

सई आणि आदित्य ह्याच मामांपासून वेगळे होणार आहेत

'माझा होशील ना' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. सुरुवातीपासून रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत.दिवसेंदिवस मालिका आणखी रंजक होत आहे. मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत. 'माझा होशील ना' मालिकेमधला आदित्य आणि त्याचे मामा म्हणजे जगातली सगळ्यात घट्ट जोडी! एकमेकांपासून कधीही वेगळे होणं शक्य नाही असं हे समिकरण. मामांसाठी आदित्य हा जीव की प्राण आणि आदित्यसाठी त्याचे मामा म्हणजे फ्रेंड, फिलॅासॅाफर, गाईड, आई-बाबा, शिक्षक, दोस्त यार, सगळंच..

पण आता सई आणि आदित्य ह्याच मामांपासून वेगळे होणार आहेत. ब्रह्मेंचं घर सोडून स्वत:चा वेगळा संसार थाटणार आहेत. खडतर जगाचा अनुभव घ्यायला आणि स्वत:ला सिद्ध करायला तयार होणार आहेत. 'माझा होशील ना' मालिकेत  नवीन अनपेक्षीत वळण येणार असून, त्यानंतर मालिकेत अनेक वेगवान घडामोडी घडणार आहेत. कथानकातील हे वळण आदित्य सईच्या नात्यालाही एका नव्या मार्गावर घेऊन जाणार आहे. हा आयुष्यातला आजवरचा सगळ्यात मोठा निर्णय सई-आदित्यसमोर कुठली आव्हानं घेऊन येतो हे पाहणं रंजक ठरेल ह्यात शंका नाही.

टॅग्स :झी मराठीगौतमी देशपांडे