Join us
Daily Top 2Weekly Top 5

'श्रीमंत घरची सून' मालिकेतून फाल्गुनी रजनीची एक्झिट, दिसणार नवा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 15:08 IST

छोट्या पडद्यावरील श्रीमंत घरची सून या मालिकेला चांगलीच पसंती मिळाली आहे.

छोट्या पडद्यावरील श्रीमंत घरची सून या मालिकेला चांगलीच पसंती मिळाली या मालिकेत आता आपल्या सर्वांना एक लवकरच एक मोठा बदल झालेला दिसून येणार आहे. या मालिकेती फाल्गुनी रजनी अर्थातच देवीकने ही मालिका सोडल्याचे समजतयं..

देवीकाची जागा सुप्रिया पठारे घेणार आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारी  सुप्रिया  लवकरच श्रीमंता घरची सून या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच या मालिकेच्या शुटिंगला सुरुवात होणार असून सुप्रिया देवीकाची भुमिका साकारणार आहे. 'पुढचं पाऊल' या मालिकेतील कांचनमालाबाईंच्या निगेटिव्ह भूमिका आणि 'होणार सून मी ह्या घरची'  या मालिकेत श्रीची मोठी आई  भूमिका सुप्रिया पाठरेने साकारली होती.  अतुल परचुरेसोबत 'जागो मोहन प्यारे' ही मालिका सुप्रिया दिसली होती. या मालिकेत  सामान्य गृहिणीची भूमिका सुप्रियाने साकारली होती. 

भाभीजी घर पे है या मालिकेतून फाल्गुनीला प्रसिद्धी मिळाली होती. फाल्गुनी लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. लहान वयात म्हणजे 11 वीत शिकत असतानाच आई आणि दोन बहिणींची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. सुरुवातीला एका आर्टिफिशिअल ज्वेलरीच्या दुकानात तिने काम केले. अभिनयाची लहानपणापासून आवड असल्याने तिने या क्षेत्रात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. तिने आजवर खिचडी, श्रीमान श्रीमती फिरसे, हप्पू की उलटन पलटन यांसारख्या विनोदी मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या. 

टॅग्स :टेलिव्हिजन