Join us

नील भट्टने दिलं पत्नी ऐश्वर्याला सरप्राईज; बिग बॉसच्या घरात साजरा केला लग्नाचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 18:55 IST

नुकतेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माने बिग बॉसच्या घरात लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

'बिग बॉस हिंदी'चं नवं पर्व दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललं आहे. पहिल्या दिवसापासूनच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हे 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे.  बिग बॉसच्या घरात गेल्यापासून दोघेही कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकतेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माने बिग बॉसच्या घरात लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये नील ऐश्वर्याला सरप्राईज देत असल्याचे दिसत आहे.  सरप्राईज पाहून ऐश्वर्या खूप खुश होते आणि नीलला मिठी मारते. यावेळी घरातील काही सदस्यही उपस्थित असतात. बिग बॉसच्या या घरातही दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग आणि प्रेम पाहायला मिळत आहे. दोघेही आपला जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवतात.

ऐश्वर्या आणि नील यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्लसवरील 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच त्यांची लव्हस्टोरी फुलली. त्यांनी २०२१मध्ये त्यांनी विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. ऐश्वर्या 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीटिव्ही कलाकार