'मन उधाण वाऱ्याचे' ही टीव्हीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक. या मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेत्री नेहा गद्रे घराघरात पोहोचली. नेहा नुकतीच आई झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात तिने गोंडस बाळाला जन्म दिला. नेहाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. सोशल मीडियावर ही गुडन्यूज नेहाने चाहत्यांसोबत शेअर केली होती.
आता नेहाने आणखी एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यामध्ये जेव्हा पहिल्यांदा नेहाला प्रेग्नंसीबद्दल कळलं तेव्हा तिची आणि घरच्यांची काय रिअॅक्शन होती, या भावना टिपल्याचं दिसत आहे. प्रेग्नंसी किटमध्ये टेस्ट पॉझिटिव्ह दिसताच नेहाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असल्याचं दिसत आहे. तर नवऱ्याला ही बातमी सांगताच तोदेखील आनंदाने उड्या मारत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. आईबाबा होणार असल्याची ही बातमी व्हिडिओ कॉलद्वारे नेहा आणि तिचा पती ईशान आपल्या कुटुंबीयांना सांगतात. त्यानंतर मित्रमैत्रिणींना याबाबत सांगत सेलिब्रेशन करत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे.
नेहाने २०१९मध्ये ईशान बापटशी लग्न केलं. लग्नानंतर ती नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी नेहा आणि ईशान आईबाबा झाले. वयाच्या ३५व्या वर्षी नेहाने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. १० फेब्रुवारीला नेहाने मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या बाळाचं नाव इवान असं ठेवलं आहे.