Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, रोमाँटिक अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 16:14 IST

अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे,

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा बग्गाने एंगेजमेंट केली आहे. अभिनेत्रीने तिचा  बॉयफ्रेंड रेस्टी कंबोजसोबत साखरपुडा केला आहे. या दोघांनी त्यांच्या यूट्यूब व्लॉगच्या माध्यमातून या प्रपोज करताना व्हिडिओ शेअर केला आहे. नेहा बग्गाने चाहत्यांना रेस्टीने तिला रोमँटिक अंदाजात कसं प्रपोज केलं हे या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवलं आहे.

नेहा बग्गाने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्रीने यावेळी लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. रेस्टीने नेहाला सरप्राईज देत एकदम फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केलं आहे. नेहाला रिंग घालत तिला प्रपोज केलं. 

रेस्टी कंबोजने तिला ज्या पद्धतीने प्रपोज केले ते पाहून नेहाला सुखद धक्का बसला. तिने काही सेकंदातच रेस्टीला होकार दिला. रेस्टी कंबोजने यूट्यूबवर एक व्लॉगही शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघांचे रोमँटिक क्षण शेअर केलेत.  

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नेहा बग्‍गा राज्जी भूमिकेसाठी ओळखली जाते. 'इश्क दा कलमा'मध्ये तिने ही भूमिका साकारली होती.  2013 मध्ये ही मालिका आली होती. या मालिकेतूनच तिने टीव्ही इंडस्ट्रीत एंट्री केली. यानंतर ती पिया रंगरेझमध्येही दिसली होती. आता ती एक युट्युबर बनली आहे. यूट्यूबवर तिचे 1 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत.

टॅग्स :टिव्ही कलाकार