Television: गेल्या काही काळामध्ये अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातील घरात गृहप्रवेश करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. तर काहींनी त्यांच्या आवडीची नवीकोरी गाडीही खरेदी केली. आता या यादीमध्ये मालिकाविश्वातील आणखी एका अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. मराठी टेलिव्हिजनवरील या लोकप्रिय नायिकेची नुकतीच स्वप्नपूर्ती झाली आहे. या अभिनेत्रीने आलिशान गाडी खरेदी करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही अभिनेत्री आहे 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री भूमिजा पाटील आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत सरस्वतीची भूमिका साकारून भूमिजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच नुकतंच भूमिजाच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना नव्या गाडीची झलक दाखवली आहे.
भूमिजा पाटीलने तिच्या इन्स्टाग्रामवर अकांउंटवर नवी गाडी खरेदी करतानाचा
व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेत्रीने 'Maruti Suzuki Brezza' ब्रॅंडची नवी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास ८.२६ लाख ते १३ लाख
इतकी आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीवर तिच्या चाहत्यांस मराठी सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. "आतापर्यंत सगळ्या गाड्या सेकंड हॅंड घेतल्या होत्या,नवीन गाडी घ्यायचं स्वप्न कायम मनात होतच आणि ते स्वप्न सत्यात उतरलं.आपल्या यशामध्ये फॅमिली तर सोबत असतेच पण फॅ्मिली सारखे मित्र पण असण किती गरजेच आहे. थॅंक्यू... रुचिर गुरव आणि सानिका काशीकर ... तुम्ही दोघांनी मल खूप साथ दिली. " असं भावुक कॅप्शन लिहित नवी गाडी घेतल्याचं सांगितलं आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री भूमिजा पाटीलने फुलाला सुगंध मातीचा जान्हवी भूमिका साकारून
छोटा पडदा गाजवला. या मालिकेत तिने साकारलेल्या या भूमिकेने सर्वांची मनं जिंकली.
त्यानंतर ती नवरी मिळे हिटलरला मालिकेत पाहायला मिळाली. सध्या ती शुभ श्रावणी मालिकेत काम करताना दिसते आहे.
Web Summary : Actress Bhumija Patil, known for 'Navari Mile Hitlerla,' joyfully purchased her first car, a Maruti Suzuki Brezza. Overwhelmed with emotion, she shared her journey of buying second-hand cars until achieving her dream with her own earnings. She thanked her friends for support.
Web Summary : 'नवरी मिले हिटलरला' फेम अभिनेत्री भूमिजा पाटिल ने अपनी पहली कार मारुति सुजुकी ब्रेज़ा खरीदी। भावुक होकर उन्होंने अपनी कमाई से सपना पूरा करने की यात्रा साझा की और दोस्तों को धन्यवाद दिया, जिन्होंने हमेशा साथ दिया।