'नवरी मिळे हिटलरला' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि गाजलेली मालिका आहे. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे चाहते नाराज आहेत. मात्र, असं असलं तरी 'नवरी मिळे हिटलरला' चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील अभिनेत्रीची स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत वर्णी लागली आहे.
एजे आणि लीलाच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. या मालिकेत वल्लरी विराज लीलाच्या भूमिकेत होती. तर राकेश बापटने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली. या मालिकेत एजेच्या पहिली पत्नी अंतराची एन्ट्री झाली होती. 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये अभिनेत्री माधुरी भारती अंतराची भूमिका साकारताना दिसली. आता 'नवरी मिळे हिटलरला' संपल्यानंतर माधुरीच्या हाती नवा प्रोजेक्ट लागला आहे. माधुरीची स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत एन्ट्री झाली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह मालिकेत अभिनेत्री माधुरी भारती दिसणार आहे. या मालिकेतील नवा लूक तिने शेअर केला आहे. "नवीन लूक, नवीन भूमिका...आजपासून शुभविवाह मालिकेत स्टार प्रवाहवर भेटुया", असं म्हणत तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता माधुरीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.