Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस 17'च्या घरात 'इंग्लिश बाबू'ची एन्ट्री! जाणून घ्या कोण आहे हा स्पर्धक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 22:12 IST

 'बिग बॉस'चा 17 वा सीझन सुरु झाला असून नावेद सोल हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे.

 'बिग बॉस'चा 17 वा सीझन सुरु झाला आहे. भाईजान सलमान त्याच्या अंदाजात मंचावर आला. मग एकापाठोपाठ एक स्पर्धकांच्या नावाची घोषणा झाली. आता आणखी एका स्पर्धकाविषयी खुलासा केला आहे. नावेद सोल हा बिग बॉस 17 मध्ये दाखल झाला.

लंडनचा रहिवासी असलेलानावेद सोलचा जन्म इटलीत झाल्याचं त्यानं सांगितलं. त्याला हिंदी येत नसून तो तोडक्या मोडक्या हिंदीत बोलताना दिसला. यावेळी सलमानने त्याला 'इंग्लिश बाबू' असे संबोधलं. शिवाय सलमान त्याच्यासोबत मस्ती करताना दिसला. शिवाय त्याला हिंदी शिकण्याचीही सुचना दिली. 

 सलमान खानने ऐश्वर्या शर्मा-नील भट्टची नावेदशी ओळख करून दिली. यादरम्यान ऐश्वर्याने नावेदसमोर बसून 'जग घुमेया' हे गाणं गायलं आणि नावेदसोबत पाणीपुरीचा आनंद लुटला. आता  बिग बॉसच्या या घरात 'इंग्लिश बाबू' काय धुमाकूळ घालणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

बिग बॉसचा हा सीझन खूपच मजेशीर असणार आहे. पहिल्याच दिवशी बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.  बिग बॉसमध्ये एक नाही तीन घरात सदस्य राहणार आहेत. 'दिल-दिमाग और दम' अशी तिन घरं बिग बॉसमध्ये आहेत. प्रत्येक स्पर्धक आपलं एक घर निवडतं आहे.

टॅग्स :बिग बॉससलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूड