Join us
Daily Top 2Weekly Top 5

ATM फ्रॉडला बळी पडला हा अभिनेता, ५० हजारांचा लागला चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 15:01 IST

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध अभिनेत्याला ५० हजारांचा चुना लावण्यात आला आहे.

स्वरागिनी फेम अभिनेता नमिश तनेजा एटीएम फ्रॉडला बळी पडला आहे. त्याला ५० हजारांचा चुना लावला आहे. फ्रॉड झाल्याचं कळल्यानंतर त्याने मुंबईतील अंबोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार, तनेजाला दिलासा मिळाला आहे की ५० हजारांचे नुकसान बँकेच्या बेजबाबदारपणामुळे झालं आहे. त्यामुळे बँकेला हे पैसे द्यावे लागणार आहेत.

याबद्दल नमिश तनेजानं सांगितलं की, मी थिएटरमध्ये चित्रपट पाहत होतो. त्यावेळी अज्ञात नंबरचे मिस्ड कॉल पाहिले. मी त्या नंबरवर कॉल बॅक केला. त्यावेळी समजले की बँकेतून कोणीतरी मला डेबिड कार्ड ब्लॉक करण्याची माहिती देण्यासाठी संपर्क करत होते.

त्याने पुढे सांगितले की, त्यांनी मला सांगितलं की माझ्या अकाउंटमधून फसवणूक करून ट्रांजेक्शन झाल्याचा संशय आहे. तेव्हा मला झटका लागला जेव्हा मी मेसेज पाहिला की १० हजार काढल्याचे पाच मॅसेज आले. 

नमिशसोबत ही घटना गणेश चतुर्थीच्या दिवशी झाली. नमिश तनेजा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा नवा शो विद्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेे. या मालिकेत तो महेश पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. नमितला छोट्या पडद्यावर स्वरागिनी मालिकेतून ओळख मिळाली. या मालिकेत तिने लक्ष्य महेश्वरीची भूमिका साकारली होती. 

नमिश तनेजाने मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, इक्यावन, एक नई पहचान व प्यार तुने क्या किया या मालिकेत काम केलं आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारनमिश तनेजा