धर्माने मुसलमान असलेल्या एका अभिनेत्रीने कुंकु लावल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे सना अमीन शेख. 'कृष्णादासी' या गाजलेल्या मालिकेत सनाने अभिनय केला होता. या मालिकेदरम्यान सनाने भांगेत कुंकु लावलं होतं, याशिवाय गळ्यात मंगळसूत्र परिधान केलं होतं. सनाने या मालिकेत हिंदू मुलीची भूमिका साकारली होती. परंतु सनाला यामुळे ट्रोलर्सचाही सामना करावा लागला होता. याविषयी सनाने फेसबुक पोस्ट लिहून ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं होतं.
सनाने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
सनाने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "पॅकअप झाल्यानंतरही मी कुंकु का लावते, याविषयी अनेक लोक मला विचारत आहेत. (हे कुंकु तेव्हाच निघतं जेव्हा मी तोंडावर पाणी मारते) हे माहित असूनही मी जर कुंकु लावत असेल तर माझ्या मुस्लिम असण्यात कोणती कमतरता येईल का. माझी आई मंगळसूत्र परिधान करायची. मंगळसूत्र ही हिंदूंची ओळख आहे. परंतु यामुळे आम्ही मुसलमान असण्याची ओळख कमी होते का?"
मला माहित आहे, "या कारणाने लोक मला ट्रोल करतील. मी इन्स्टा आणि फेसबूक सोडून जात का नाही, असं काही लोक मला लिहून पाठवतात. हे मनोरंजन नाही का? तुम्ही टीव्हीवर माझी मालिका का पाहता? हे मुस्लिम भाषेत 'हराम' नाही का? अल्लाह मला यासाठी नरकात पाठवेल का? आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवर तुमचा वेळ वाया घालवत आहात, जिथे तुम्ही मला सल्ला देत आहात, त्यामुळे तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल का?", अशा शब्दात सना अमीन शेखने तिला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं होतं. सनाच्या धाडसी वृत्तीचं सर्वांनी कौतुक केलं असून, तिने जे म्हणणं मांडलं आहे, त्यासाठी समर्थन दिलं. सना