Join us

'मुरांबा'मध्ये आली रमाची डुप्लिकेट? लोकप्रिय अभिनेत्याचीही होणार एन्ट्री, मालिकेत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:56 IST

रमा आणि अक्षयला एकत्र आलेलं पाहून चाहत्यांनाही आनंद झाला होता. मात्र आता दुसऱ्याच क्षणी त्यांची ताटातूट होत असल्याचं दिसणार आहे.

'मुरांबा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. काही दिवसांपूर्वीच मालिकेने नवं वळण घेतलं होतं. रेवाला धडा शिकवत तिला तुरुंगात टाकल्यानंतर रमा आणि अक्षय एकत्र आले. रमा आणि अक्षयला एकत्र आलेलं पाहून चाहत्यांनाही आनंद झाला होता. मात्र आता दुसऱ्याच क्षणी त्यांची ताटातूट होत असल्याचं दिसणार आहे. 

मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यामध्ये रमाचा अपघात होऊन ती दरीत कोसळल्याचं दाखविण्यात आलं आहे. तर रमाला दरीत कोसळताना पाहून अक्षयची अर्धमेली अवस्था झाली आहे. या ट्रॅकवरच मालिकेत नवीन एन्ट्री होणार आहे. ज्या गाडीने रमाचा अपघात झाला त्या गाडीतून तिच्यासारखीच दिसणारी हुबेहुब व्यक्ती बाहेर निघते. रमाची डुप्लिकेट असणाऱ्या या व्यक्तीचं नाव माही असं आहे. आता माहीच्या येण्याने मालिकेत नवं वळण तर आलं आहेच. पण, यामुळे रमा-अक्षयच्या आयुष्याला मात्र वेगळंच वळण लागलं आहे. 

या ट्विस्टबरोबरच 'मुरांबा' मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. होणार सून मी ह्या घरची फेम अभिनेता रोहन गुजर 'मुरांबा' मालिकेत दिसणार आहे. ज्या कारने रमाचा अपघात होतो. त्या कारमधून माहीसोबतच रोहन बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. प्रोमोमध्ये रोहनची एन्ट्री झाल्याचं दिसत आहे. तर अपघातामुळे दोघांच्याही चेहऱ्यावरचे रंगदेखील उडाल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाहशशांक केतकरटिव्ही कलाकार