Join us

'मुरांबा' मालिकेचे १००० भाग पूर्ण, शशांक केतकर म्हणाला- "३ वर्षांपेक्षा जास्त काळ..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:35 IST

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेने १ हजार भागांचा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने पोस्ट शेअर केली आहे. 

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. 'मुरांबा' मालिकेतील अक्षय-रमाची जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता या मालिकेने १ हजार भागांचा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने पोस्ट शेअर केली आहे. 

'मुरांबा' मालिकेला १००० भाग पूर्ण झाल्यानंतर शशांकने स्टार प्रवाह, सहकलाकार आणि त्यासोबतच चाहत्यांचेही आभार मानले आहेत. 

'मुरांबा'साठी शशांकची पोस्ट

'मुरांबा' या आमच्या ( खरं तर तुमच्या) मालिकेचे १००० भाग पूर्ण होतायत आज. खूप मोठा टप्पा गाठला आहे, ३ वर्षांपेक्षा जास्त काळ हा प्रवास सुरू आहे, आणि तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव अजूनही होतो आहे.

हे सगळं खरंच एका स्वप्नसारखं वाटतंय. कोणत्याही कलाकाराला पारितोषिकांपेक्षा तुमची प्रतिक्रिया, कौतुकाची थाप आणि प्रेमाची साथ हवी असते. हे सगळंच या १००० भागात मला भरभरून मिळालं.

माझ्यातला (हट्टी) विद्यार्थी कायम भुकेला असतो, जो इथून पुढेही असेल. मी स्वतः किती एपिसोड झाले यापेक्षा गोष्ट किती रंजक आणि खिळवून ठेवणारी आहे यावर विश्वास ठेवतो, आणि या पुढेही माझ्यासाठी गोष्ट आणि तुमचं मनोरंजन सगळ्यात महत्वाचं असेल.

@star_pravah @panoramaentertainmentpvtltd तुमचे मनापासून आभार. हे अतूट नाते सदैव असेच राहूदे. @rajwadesatish

पडद्यवारचे आणि मागचे सर्व सह कलाकार.. तुमच्या मुळे माझ्या कष्टांना अर्थ मिळाला. खूप खूप प्रेम तुम्हाला. 

'मुरांबा' मालिका गेली ३ वर्षांपासून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करत आहे. आज 'मुरांबा'  मालिकेचा १०००वा भाग प्रसारित करण्यात आला. या मालिकेत शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, निशाणी बोरुले, सुलेखा तळवलकर, प्रतिमा कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

टॅग्स :शशांक केतकरस्टार प्रवाहटिव्ही कलाकार