Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ex गर्लफ्रेंड आयेशा खानच्या 'शरारत' गाण्यावर थिरकला मुनव्वर फारुकी, बायको बघतच राहिली, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:10 IST

एक्स गर्लफ्रेंड आयेशा खानच्या या गाण्याची भुरळ मुनव्वरलाही पडली. बर्थडे पार्टीत मुनव्वरने क्रिस्टल डिसुजासोबत शरारत गाण्यावर डान्स केला.

स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस १७ फेम मुनव्वर फारुकीने २८ जानेवारीला त्याचा वाढदिवस साजरा केला. मुनव्वरने मुंबईतील त्याच्या घरी छोटी पार्टी आयोजित केली होती. अनेक सेलिब्रिटींना त्याने बर्थडे पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. या बर्थडे पार्टीमधील मुनव्वरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मुनव्वर 'धुरंधर'मधील 'शरारत' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 

'धुरंधर' सिनेमातील शरारत हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. या गाण्यावरील अनेक रील्सही व्हायरल झाले होते. या गाण्यातील क्रिस्टल डिसुजा आणि आयेशा खान यांच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं होतं. 'धुरंधर'मधील या गाण्यावर बर्थडे पार्टीत मुनव्वर फारुकी थिरकताना दिसला. एक्स गर्लफ्रेंड आयेशा खानच्या या गाण्याची भुरळ मुनव्वरलाही पडली. बर्थडे पार्टीत मुनव्वरने क्रिस्टल डिसुजासोबत शरारत गाण्यावर डान्स केला. एक्स गर्लफ्रेंडच्या गाण्यावर डान्स करताना पाहून मुनव्वरची बायकोही त्याच्याकडे पाहतच राहिली. 

मुनव्वर आणि आयेशा खान रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉस १७ मध्ये मुनव्वर असताना आयेशाने घरात एन्ट्री घेत त्याची पोलखोल केली होती. मुनव्वर तिला आणि नाजिलाला एकत्र डेट करत असल्याचं तिने सांगितलं होतं. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मुनव्वरने महजबीन कोटवालासोबत लग्न केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Munawar Faruqui dances to ex Ayesha Khan's song, wife watches.

Web Summary : Munawar Faruqui celebrated his birthday with a party. A video shows him dancing with Krystle D'Souza to his ex-girlfriend Ayesha Khan's song 'Shararat' from 'Dhurandhar'. His wife was also present and watched him dance. Munawar recently married Mehzabeen Kotwala after exiting Bigg Boss 17.
टॅग्स :बिग बॉस १९टिव्ही कलाकार