प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी बाबा झाला आहे. मुनव्वरच्या दुसऱ्या पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज मुनव्वरने त्याच्या चाहत्यांना दिली आहे. मुनव्वरला दुसऱ्या पत्नीकडून कन्यारत्न झालं आहे. मुलीच्या आगमनाने मुनव्वर आणि त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. "घर मे बरकत आई", असं म्हणत मुनव्वरने सोशल मीडियावर लेकीच्या जन्मानंतरचा आनंद व्यक्त केला आहे.
मुनव्वरने हॉस्पिटलमधले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या नवजात लेकीची झलकही पाहायला मिळत आहे. "घर मे बरकत आई, दुआ मे खास याद रखे" असं कॅप्शन त्याने फोटोंना दिलं आहे. मुनव्वरच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. धनश्री वर्मा, शरीब हाशमी, आकांक्षा पुरी, वरुण धवन, शहनाज गिल, सोनाली बेंद्रे, रुबिना दिलैक या सेलिब्रिटींनी मुनव्वरच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तर चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
मुनव्वरने मेहझबीन कोटवाला हिच्याशी २०२४ मध्ये निकाह केला. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगी झाली आहे. मुनव्वर आणि मेहझबीनचं हे दुसरं लग्न आहे. मेहझबीन एक मेकअप आर्टिस्ट असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. तर मुनव्वरने २०१७ मध्ये जस्मिनसोबत लग्न केलं होतं. पण, २०२२ मध्ये ते वेगळे झाले. त्यांना एक मुलगा आहे.
Web Summary : Comedian Munawar Faruqui and his second wife are blessed with a baby girl. He shared photos from the hospital, expressing his happiness. Celebrities and fans congratulated the couple. Munawar married Mehzabeen Kotwala in 2024. This is their first child together.
Web Summary : कॉमेडियन मुनव्वर फारुकी और उनकी दूसरी पत्नी को बेटी हुई है। उन्होंने अस्पताल से तस्वीरें साझा कर अपनी खुशी जाहिर की। कई हस्तियों और प्रशंसकों ने दंपति को बधाई दी। मुनव्वर ने 2024 में मेहजबीन कोटवाला से शादी की। यह उनका पहला बच्चा है।