Join us
Daily Top 2Weekly Top 5

काल रात्री पाचसहा पोरं वरडत आली...; किरण मानेंची पोस्ट वाचून म्हणाल नाद खुळा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 10:16 IST

मराठमोळे अभिनेते किरण माने  (kiran mane ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. किरणमानेंनी पोस्ट टाकली रे टाकली की ती क्षणात व्हायरल होणार. सध्या त्यांची अशीच एक पोस्ट जाम व्हायरल होतेय.

मराठमोळे अभिनेते किरण माने  (kiran mane ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. मानेंनी पोस्ट टाकली रे टाकली की ती क्षणात व्हायरल होणार... सध्या त्यांची अशीच एक पोस्ट जाम व्हायरल होतेय. किरण माने सध्या ‘मुलगी झाली हो’  (Mulgi Zali Ho) या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारत आहेत. त्यांची ही भूमिका लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की, लोक त्यांना आताश: विलास पाटील याच नावानं ओळखू लागले आहेत. याबद्दलचा एक किस्सा किरण माने यांनी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.माने यांनी एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यासोबत एक भलीमोठी पोस्टही आहे.

पोस्टमध्ये ते लिहितात,

 काल रात्री १२.३० / १ वाजता पोवई नाक्यावर एकटा फिरत असताना पाचसहा पोरं "विलास पाटीSSSSल... विलास पाटीSSSSSSSल" असं आनंदानं वरडत आली....मध्यरात्री गाडी काढून सातारच्या सुनसान रस्त्यांवरनं फिरनं ह्यो माझा आवडता छंद !...शुटिंगमधनं सुट्टी मिळाल्यावर पयला सातारा गाठतो मी. रात्री जेवन झाल्यावर मध्यरात्री नाक्यावर नायतर राजवाड्यावर गाडी लावायची...आन् रिकाम्या, शांत, निवांत पहुडलेल्या वरच्या आनि खालच्या रोडवरनं चालत फिरन्यात जे सुख हाय त्याचा नाद नाय करायचा.. जगात भारी भावांनो !!असाच फिरत असताना काही पोरांनी मला बघितलं आन् गराडा घातला... "सर, तुमचं काम लै नादखुळा असतं.. माझी आई तुमची लै मोट्टी फॅन हाय. प्लीज तिच्याशी व्हिडीओकाॅलवर बोला. ती तुमाला बगून येडीच हुईल."...मी म्हन्लं, "अरे एवढ्या रात्री कशाला उठवतोयस आईला?"..."नाय नाय सर, आता सुट्टी नाय." असं म्हनत कुनी आईला झोपेतनं उठवुन सांगीतलं, "आई, मला कोन भेटलं बघ."... तिकडून "आगंबयाSS ईलास पाटील?! नमस्कार ओ. तुमचा कार्यक्रम लै आवडतो आमाला." वगैरे सुरू झालं. मग कुनाच्या बहिनीशी, कुनाच्या वडिलांशी बोलून झालं..."सर तुमी सापडत नाय कधी..आता घावलाय तर सुट्टी नाय तुमाला."...सेल्फी वगैरे झाल्यावर निरोप घेताना पोरांनी हात पुढे केले. म्हन्ले "सर, ऑटोग्राफ द्या.".. म्हन्लं, "हातावर?".. म्हन्ले, "मंग? आता सुट्टी नाय."... ऑटोग्राफ दिला.. म्हन्ले, "नाय, खाली 'विलास पाटील' लिहा.".. लिहून टाकलं.. त्याशिवाय 'सुट्टी' मिळालीच नसती मला.  हे सुरू असताना कुनीतरी व्हिडीओ काढला. आनि आज कुठनंतरी नंबर मिळवून मला व्हिडीओ पाठवला. म्हन्लं, "नंबर कुनी दिला???".. म्हन्ले "सातार्‍यात तुमचा नंबर मिळवनं आवघड हाय व्हय? मिळवला.. सुट्टी नाय..! 

 

 

   

 

टॅग्स :किरण माने