Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्प्लिट्सविला 16' मध्ये मिस युनिव्हर्सच्या फायनलिस्टला चप्पलने मारहाण?, TV शोमध्ये तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:58 IST

Akanksha choudhary: आकांक्षाने सोशल मीडियावर 'स्प्लिट्सविला 16' मध्ये दिक्षासोबत झालेल्या वादावर भाष्य केलं आहे.

डेटिंग रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सविला 16' सुरु झाल्यापासून सातत्याने चर्चेत येत आहे. आतापर्यंत या शोमधील अनेक स्पर्धकांमध्ये वादविवाद, भांडणे पाहायला मिळाली. मात्र, यात सर्वाधिक चर्चा रंगली ती आकांक्षा चौधरी आणि दिक्षा पवार या दोघींची. अलिकडेच या दोघींमधील वाद विकोपाला गेला होता. या दोघींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता आकांक्षाने दिक्षाने तिला चप्पलने मारहाण केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सध्या पुन्हा एकदा हा शो चर्चेत आला आहे.

आकांक्षाने सोशल मीडियावर 'स्प्लिट्सविला 16' मध्ये दिक्षासोबत झालेल्या वादावर भाष्य केलं आहे. यात तिने दिक्षावर अनेक आरोपही केले आहेत. विशेष म्हणजे दिक्षाने फक्त माझ्यावर हल्लाच केला नाही तर तिने मला चप्पलने सुद्धा मारलं, असं ती या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

''ती फक्त भांडणं नव्हती तर ती एक हिंसा होती. मला हिल्सने (चप्पल) मारहाण करण्यात आली. जोपर्यंत माझ्या ओठातून रक्त येत नाही तोपर्यंत मला थोबाडात मारण्यात आलं. माझ्या डोळ्यांखालून सुद्धा रक्त यायला लागलं होतं.माझ्या मानेवर मारहाणीमुळे जखमा झाल्या आहेत. आणि, हे सगळं नॅशनल टिव्हीवर झालं. १०-१५ दिवसानंतर सुद्धा माझ्या शरीरावरील जखमा दिसत होत्या. आणि, लोकं म्हणतायेत माझ्या अंगातून रक्त आलंच नाही'', असं आकांक्षाने म्हटलं.

पुढे ती म्हणते, ''या सगळ्याची सुरुवात एका खोट्या गोष्टीपासून झाली.  ते सुद्धा एका नॅरेटिव्ह करायच्या नादात आणि मी कशी वाईट आहे हे लोकांना दाखवण्यासाठी. आणि, अजून सुद्धा माझ्याविषयीच्या त्या चर्चा थांबलेल्या नाहीत. ज्यावेळी ते लोक नॅरेटिव्ह करण्यात बिझी होते. त्यावेळी मी शरीरावर झालेल्या जखमा सहन करत होते. प्रत्येक शूटच्या वेळी मला जखमी अवस्थेत जावं लागत होतं. मी भलेही या जखमा लपवायचा प्रयत्न करत होते. पण, मला त्याचा त्रास दररोज होत होता. त्या दिवसापासून मी मनातून तुटून गेले. मला सतत एकटेपणा जाणवत होता. पूर्णपणे मी डिस्टर्ब झाले होते. मला शो सोडावासा वाटत होता. पण, मी राह मानणारी नव्हते त्यामुळे मी तो सोडला नाही. आता मी कशालाच उत्तर देत नाही. मी रिअॅक्ट होणं बंद केलं आहे.''

दरम्यान, स्प्लिट्सविला १६ या शोचं शुटिंग महिन्याभरापूर्वीच संपलं असून नुकताच हा शो ऑन एअर गेला आहे. विशेष म्हणजे हा शो सुरु झाल्यापासून त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. आकांक्षाने अनेक ब्युटी पेजेंट्समध्ये सहभाग नोंदविला आहे. स्प्लिट्सविला १६ मध्ये येण्यापूर्वी ती मिस युनिव्हर्स इंडिया 2025 मध्ये सहभागी झाली होती. मिस युनिव्हर्समध्ये ती फायनलिस्ट राहिली आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता कमालीची आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Splitsvilla 16: Miss Universe finalist allegedly assaulted with slipper; brawl on TV show.

Web Summary : Splitsvilla 16 sees drama as Akanksha accuses Diksha of assault with a slipper during a fight. Akanksha details injuries and emotional distress, claiming the incident occurred amidst false narratives on national television, leaving her disturbed.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमिस युनिव्हर्ससेलिब्रिटी