Join us

प्रेक्षकांची ही आवडती मालिका पुन्हा एकदा ठरली टिआरपी रेसमध्ये अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 19:17 IST

या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

ठळक मुद्देयेत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर होती. पण यंदाच्या आठवड्यात या मालिकेकडे प्रेक्षक पुन्हा वळले आहे हेच या टिआरपी रेटिंगवरून आपण म्हणू शकतो.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम दुसऱ्या नंबरवर असून या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

अग्गंबाई सासूबाई ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात दुसऱ्या स्थानावर होती. यंदाच्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना चांगलेच आवडत असल्याचे दिसून येत आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.

नुकतीच सुरू झालेली लग्नाची वाईफ वेडिंगची बायको ही मालिका पाचव्या क्रमांकावर आहे. ही मालिका गेल्या कित्येक आठवड्यांपासून पहिल्या पाचमध्ये आहे.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोस्वराज्य रक्षक संभाजीअग्गंबाई सासूबाईचला हवा येऊ द्या