Join us  

Mazya Navryachi Bayako : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका पुन्हा येतेय; वाचा, कुठे पाहता येणार? कधीपासून सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 4:19 PM

Mazya Navryachi Bayako : तुफान लोकप्रिय झालेली ही मालिका कधीच संपली. पण प्रेक्षक अद्यापही या मालिकेला मिस करतात. तुम्हीही या मालिकेला मिस करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazya Navryachi Bayako) या मालिकेनं प्रेक्षकांना नुसतं वेड लावलं होतं. झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेनं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. नटव्या शनायाच्या नखऱ्यांना भुललेला गुरूनाथ आणि त्याला वठणीवर आणणारी त्याची खमकी बायको राधिका अशी ही भन्नाट कथा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली होती. आता ही मालिका अचानक आठवण्याचं कारण काय तर या मालिकेबद्दलची नवी अपडेट. होय, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता तुम्हाला पुन्हा बघता येणार आहे.  तुफान लोकप्रिय झालेली ही मालिका कधीच संपली. पण प्रेक्षक अद्यापही या मालिकेला मिस करतात. तुम्हीही या मालिकेला मिस करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ही मालिका आता पुन्हा सुरू होणार आहे.  

एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका 27 मार्च पासुन zee चित्र मंदिर वरती पुन्हा सुरू होणार आहे.  23 ऑगस्ट 2016 रोजी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता आणि बघता बघता ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. मालिकेतील राधिका, शनाया, गुरूनाथ ही पात्रही तेवढीच लोकप्रिय झाली होती. आज इतक्या वर्षानंतरही ही मालिका आणि यातील कलाकारांना प्रेक्षक विसरलेले नाहीत. 

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अभिनेत्री अनिता दातेनं राधिकाची साकारली होती. तर तिच्या नवऱ्याची म्हणजेच गुरूनाथची भूमिका अभिनेता अभिजित खांडकेकरनं जिवंत केली होती. शनायाची भूमिका सुरूवातीला रशिका सुनील साकारली होती. नंतर या भूमिकेत इशा केसरकर दिसली होती. याशिवाय अरुण नलवडे,मिहीर राजदा, अदिती द्रविड, श्वेता मेहेंदळे, यश प्रधान, सचिन देशपांडे,रुचिरा जाधव यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोटेलिव्हिजन