Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील शेफालीच्या पतीचं आहे मुंबई इंडियन्सशी 'हे' खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 16:17 IST

Mazi Tuzi Reshimgath fame Kajal Kate: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे हिने साकारली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदेंची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे. नुकतेच त्या दोघांचे मोठ्या दिमाखात लग्न पार पडले. या दोघां व्यतिरिक्त छोट्या परीची घराघरात चर्चा होताना दिसते आहे. तसेच या मालिकेतील नेहाची सहकारी आणि जवळची मैत्रीण शेफाली या पात्रानेदेखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. शेफालीची भूमिका अभिनेत्री काजल काटे (Kajal Kate) साकारते आहे. आज काजलचा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. 

अभिनेत्री काजल काटे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. खूप दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवरील मुंबई इंडियन्स संघातील खेळांडूंसोबतचा फोटो चर्चेत आला आहे. तिचे नेमके काय कनेक्शन आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

तर आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये प्रतिक कदम प्रशिक्षक म्हणून काम पाहातो आहे. प्रतिक काजलचा नवरा असून तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सामन्यादरम्यानचे अनेक अनेक फोटो शेअर केले आहेत.

माझी तुझी रेशीमगाठमधील या भूमिकेबद्दल काजल सांगते की, 'शेफाली अगदी माझ्यासारखीच आहे. आनंदी, सगळ्यांना हसवत असणारी, काहीशी अल्लड अशीच मीदेखील आहे. त्यामुळे शेफाली माझ्या फार जवळची आहे. शेफाली म्हटले की माझ्या डोळ्यांसमोर येते ती 'कभी खुशी कभी गम' चित्रपटातील काजोल आणि 'जब वी मेट'मधली करीना. या दोघींचे मिश्रण म्हणजे शेफाली आहे.'

'शेफालीची भूमिका माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली आहे. लोक मला आता ओळखू लागले आहेत. मला मेसेजेस, फोनद्वारे प्रेक्षक प्रतिक्रिया देतात. आमच्या आयुष्यातही शेफालीसारखी एक तरी मैत्रीण असावी अशी प्रतिक्रिया मिळते तेव्हा खूप आनंद होत असल्याचे काजलने सांगितले.

टॅग्स :झी मराठीमुंबई इंडियन्स