Join us  

Video: अखेर नेहा सोडून जाणार तिचं घर; यश करु शकेल का तिची मदत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 8:02 PM

Mazhi tuzhi reshimgaath: नेहाच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटामध्ये यशने तिची खंबीरपणे साथ दिली आहे. तिचं घर सोडवण्यापासून ते परांजपे वकिलांच्या कपटी डावापर्यंत अनेक कठीण प्रसंगात त्याने तिला आधार दिला आहे.

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत सध्या यश आणि नेहा यांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. इतके दिवस मैत्रीचं खोटं नाटक करणाऱ्या यशचं सत्य समोर आल्यापासून नेहाने त्याच्याशी कायमचा अबोला धरला आहे. इतकंच नाही तर तिने नोकरीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता यश तिची मनधरणी करण्याचा, तिच्यासमोर स्वत:ची बाजू मांडायचा प्रयत्न करत आहे.  परंतु, नेहा त्याची कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नाही. यामध्येच आता नेहा पुन्हा एका नव्या संकटात सापडणार असून यश तिच्या मदतीला धावून जाणार आहे.

नेहाच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटामध्ये यशने तिची खंबीरपणे साथ दिली आहे. तिचं घर सोडवण्यापासून ते परांजपे वकिलांच्या कपटी डावापर्यंत अनेक कठीण प्रसंगात त्याने तिला आधार दिला आहे. परंतु, या दोघांमध्ये वाद झाल्यापासून नेहा यशची कोणतीही मदत स्वीकारत नाहीये. यामध्येच आता पुन्हा एकदा नेहाच्या घरावर जप्ती येणार आहे. आणि पर्यायाने तिला तिचं घर सोडावं लागणार आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचं चित्रीकरण कुठे सुरू आहे माहितीये का?

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहाचं घर बँकेने विकल्याचं समोर येतं. बँकेने तिच्या दारावर घर विकल्याची नोटीस लावलेली असते. याविषयीची माहिती ती शेफालीला देते. शेफालीला ही गोष्ट समजताच ती घडलेला प्रकार समीरला सांगते. यावेळी यश सारं काही ऐकत असतो. त्यामुळे आता यश पुन्हा एकदा नेहाच्या मदतीसाठी पुढे सरसावणार आहे.

दरम्यान, नेहाची होणारी घुसमट, टेन्शन या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी यश प्रयत्न करतो. परंतु, नेहा त्याची मदत स्वीकारेल का? ती त्याला माफ करेल का? पुन्हा या दोघांमध्ये मैत्री होईल का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. परंतु, या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या माध्यमातूनच मिळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे