Join us

मेकअपशिवाय देखील 'माझा होशील ना'मधील सई दिसते तितकीच सुंदर, सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 17:30 IST

सई एक उत्तम गायिका देखील आहे.

अभिनेत्री गौतमी देशपांडे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस आणि स्टनिंग लूकमधील फोटो शेअर करत प्रेक्षकांनी वाहवा मिळवत असते. आता तिने तिचा मेकअप लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतदेखील ती तितकीच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. फोटोमध्ये गौतमीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसते आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मी़डियावर व्हायरल झाला आहे. 

झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेतून गौतमी देशपांडे घराघरात पोहोचली. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सईची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय. विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. गौतमीने कमी वेळात छोट्या पडद्यावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. या शिवाय ती एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.

टॅग्स :गौतमी देशपांडेझी मराठी