Join us

विदेशातही आहे 'तुला शिकवीन चांगला धडा'ची क्रेझ; सिंगापूरमध्ये शिवानीला भेटली चाहती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 16:46 IST

Shivani rangole: शिवानी रांगोळेने नुकताच तिचा अनुभव शेअर केला आहे.

सध्या छोट्या पडद्यावर तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत कविता लाड-मेढेकर, शिवानी रांगोळे आणि ऋषिकेश शेलार ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकली आहेत. विशेष म्हणजे उत्तम कथानक असलेल्या या मालिकेची लोकप्रियता पार सातासमुद्रापार पोहोचली असून नुकताच याचा प्रत्यय शिवानीला आला आहे.

अलिकडेच शिवानी सिंगापूरला तिचं व्हेकेशन एन्जॉय करायला गेली होती. या व्हेकेशनमधील अनुभव तिने नुकताच शेअर केला आहे. "सिंगापूरला मी दोन दिवससाठी गेली होती. एक खास प्रोजेक्ट शूट करायला.  बाहेरगावी शूट म्हणजे काम आणि मजा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होतात. पूर्ण दिवस 'तुला शिकवीन चांगलाच धडाच' शूटिंग करून रात्री मी फ्लाइटने सिंगापूरला गेले. मला कायम नवनवीन ठिकाणांना भेट देण्याचं कुतुहल असतं. तिथे फक्त दोनच दिवस माझ्या हातात होते पण माझ्या उत्साह आकाशाएवढा होता. जिथे जिथे शूट करत होते तिथे तर मी फिरलेच पण शूटिंग संपल्यावर मी भटकंतीसाठी माझी बॅकपॅक घेऊन मी निघायचे. सिंगापूरमध्ये  'गार्डन बाय द बे' , मरिना बे  सॅण्डस , मुस्तफा मार्केट आणि लिटल इंडिया या ठिकाणी मी फिरले, असं शिवानी म्हणाली.

पुढे ती म्हणते, सिंगापूरमध्ये भटकताना माझी गाठ भेट एका पुणेकराशी झाली. काहीतरी भेट घरी घेऊन जायची म्हणून एका दुकानात शॉपिंगसाठी गेले असता हे पुणेकर भेटले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पुणेकर त्या दुकानाचे मालक होते. योगायोग असा की त्यांची आई आमचा कार्यक्रम  'तुला शिकवीन चांगलाच धडा' बघते. गप्पा गोष्टींमध्ये कधी वेळ गेला कळलेच नाही पण ही भेट माझ्यासाठी अनपेक्षित होती आणि ती माझ्या आठवणीत नेहमीच राहील. 

टॅग्स :शिवानी रांगोळेटेलिव्हिजनसेलिब्रिटी